सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-
1) संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
2) सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
3) पदम पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरुप :-
1) या पुरस्काराची रक्कम रु.10 लाख इतकी असेल.
2) पुरस्कारार्थीला शाल  आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.

समितीचे अध्यक्ष व सदस्य :-
1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य    अध्यक्ष
2) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य   सदस्य
3) मा. सचिव, सांस्कृतिक कार्य   सदस्य
4) मा. संचालक, सांस्कृतिक कार्य   सदस्य सचिव
5) तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती

1.मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य- अध्यक्ष
2.मा. राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य उपाध्यक्ष
3.मा. सचिव, सांस्कृतिक कार्य सदस्य
4.संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय सदस्य सचिव
. . .
1.डॉ . अनिल काकोडकर (शास्रज्ञ ) अशासकीय सदस्य
2.डॉ. प्रकाश आंबेडकर (सामाजिक कार्य) अशासकीय सदस्य
3.श्री बाबा कल्याणी (उद्योग) अशासकीय सदस्य
4.श्री संदीप पाटील (क्रीडा) अशासकीय सदस्य
5. श्री दिलीप प्रभावळकर (कला) अशासकीय सदस्य
आतापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत-
मान्यवरांची यादी
मान्यवरांचे नाववर्ष क्षेत्र
श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे 1997 साहित्य
श्रीमती लता मंगेशकर 1998 संगीत
श्री. सुनील गावस्कर 1999 क्रीडा
डॉ. विजय भाटकर 2000 विज्ञान
श्री. सचिन तेंडुलकर 2001 क्रीडा
पं. भीमसेन जोशी 2002 संगीत
डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग 2003 समाजप्रबोधन
डॉ. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे 2004 समाजप्रबोधन
डॉ. रघुनाथ माशेलकर 2005 विज्ञान
श्री. रतन टाटा 2006 उद्योग
श्री. रामराव कृष्णराव उर्फ आर.के.पाटील 2007 समाजप्रबोधन
डॉ.नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी 2008 समाजप्रबोधन
श्री. मंगेश पाडगावकर 2008 साहित्य
श्रीमती सुलोचना लाटकर 2009 मराठी चित्रपट
डॉ. जयंत नारळीकर 2010 विज्ञान
डॉ.अनिल काकोडकर 2011 विज्ञान
श्री. बाबासाहेब पुरंदरे 2015 साहित्य
श्रीमती आशा भोसले (घोषित)2021संगीत