महाराष्ट्र शासन
 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

अं.क्र.विभागशीर्षकदिनांकआकारडाऊनलोड
1 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईसांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई हे या कार्यालयातील तसेच रंगभवन खुले नाट्यगृह, धोबीतलाव, मुंबई येथील अभिलेख्यावर वाळवी, उंदीर व मच्छर प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यासाठी इच्छुक संस्थांनाकडून दरपत्रक मागवित आहे. दि. २२ ऑगस्ट ते दि. 1 सप्टेंबर, 202३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत इच्छुक संस्थांनी आपली दरपत्रके सोबत दिलेल्या अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात मोहोरबंद लिफाप्यात संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पहिला मजला, जुने सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०० ०३२ येथे पाठवावीत किंवा प्रत्यक्ष जमा करावीत.22/08/20233682KB
2 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट-ब अराजपत्रित व गट-क संवर्गातील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दिनांक 15 ऑगस्ट, 2023 ते 5 सप्टेंबर, 2023 या कालावधीत https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/ या संकेतस्थळावर आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरातीचे तपशील सोबत जोडण्यात येत आहेत.15/08/2023756KB
3 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईअंजुमन सैर ए गुलशन फरोशन, नवी दिल्ली या संस्थेमार्फत "फुल वालो की सैर" या महोत्सवाचे दिनांक 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशातील अनेक राज्य सांस्कृतिक कलापथक पाठवून आपल्या राज्याची कला सादर करीत असतात. या महोत्सवात महाराष्ट्र राज्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. या महोत्सवात दिनांक 4 नोव्हेंबर, 2023 रोजी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राची लोककला आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबाबत प्रस्तावित आहे. तरी इच्छुक संस्थांनी या महोत्सवात लोककला वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहे. संस्थांनी याबाबतचे दरपत्रक दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत mahaculture@gmail.com या ई-मेल वर कार्यक्रमाची संकल्पना आणि अंदाजित रक्कम पाठवावी.14/07/2023