Accessibility Tools
A+
A−
High Contrast
Negative Contrast
Links Underline
Readable Font
Reset


 महाराष्ट्र शासन
सांस्कृतिक कार्य संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, मुंबई

प्रस्तावना : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

        महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे.

        महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी तत्कालीन मा.मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे, या गोष्टीस मान्यता दिली. सन १९६०-७० या दशकातील पंचवार्षिक योजनांना मान्यता मिळताच सन १९७० साली मनोरंजन समितीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये रुपांतर करण्यात आले.

        सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात. या राज्यातील सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सव आयोजित करण्यात येतात. त्यात राज्य नाट्य, संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गमंत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी विविध कला महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे, शाहिरी प्रशिक्षण शिबिरे, विधीनाटय प्रशिक्षण शिबिरे, दशावतार प्रशिक्षण शिबिरे, दंडार प्रशिक्षण शिबिरे, खडीगंमत प्रशिक्षण शिबिरे, झाडीपट्टी प्रशिक्षण शिबिरे, संगीतबारी /लावणी प्रशिक्षण शिबिरे अशी प्रत्येकी दहा दिवसाचे या प्रमाणे एकूण ६० शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतंर्गत कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे, सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देणे इत्यादी कामे या संचालनालयाकडे आहेत. अधिक माहिती

ठळक घडामोडी

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शाखीय संगीत प्रोत्साहन योजनेंतर्गत युवा शिष्यवृत्ती योजना या योजनेंतर्गत शाखीय संगीतामध्ये वादन व गायन शिक्षण घेणाऱ्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या कलेच्या शिक्षणात मदत करण्यसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. शिष्यवृत्ती प्रतिमाह रु. ५०००/- याप्रमाणे दोन वर्ष असेल. विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी https://mahaanudan.org या शासकीय संकेतस्थळावर नवीन नोंदणी वर जाऊन अर्ज करता येतील. तसेच अर्ज व नियम https://mahaanudan.org या शासकीय संकेतस्थळावर भारत रत्न पं. भीमसेन जोशी शाखीय संगीत प्रोत्साहन योजनेंतर्गत युवा शिष्यवृत्ती योजना या शिर्षाखाली उपलब्ध होतील. सदर अर्ज दि. ०८ मे, २०२६ ते दि. ०८ जून, २०२६ या कालावधीत ऑनलाइनरित्या उपलब्ध असतील.


प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून मुंबई, कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती व नागपूर विभागातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या संस्था गायन, वादन, नृत्य, नाटक, तमाशा, नकला, कठपुतलीचे खेल तसेच लोककला या क्षेत्रात संस्कृतीक कार्यक्रमचे जनतेसाठी निःशुल्क सादरीकरण करेल अशा संस्था अर्ज करू शकतील. संस्थांनी चुकीचे कागदपत्रे सादर करून सहाय्यक अनुदान प्राप्त केल्याचे आढळून आल्यास सदर संस्था भविष्यात शासनाच्या अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येईल. तसेच सदर संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी https://mahaanudan.org या शासकीय संकेतस्थळावर नवीन नोंदणीवर अर्ज करता येईल. तसेच अर्ज व नियम https://mahaanudan.org या शासकीय संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरत संस्कृतीक संस्थांना सहाय्यक अनुदान या शिर्षाखाली उपलब्ध होईल. सदर अर्ज दि. ०८ मे, २०२६ ते दि.०८ जून, २०२६ या कालावधीत ऑनलाईनरित्या उपलब्ध असतील.


जाहीर निवेदन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव, स्पर्धा व शिबिरांचे संपूर्ण राज्यभर आयोजन करण्यात येते. सदर उपक्रमांच्या स्थानिक आयोजनाकरिता सांस्कृतिक क्षेत्रातील अनुभवी व जाणकार व्यक्तींची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज २७.०४.२०२६ ते ०८.०५.२०२६ या कालावधीत मागविण्यात आले होते. त्यानंतर प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अर्ज भरण्याची मुदत ०९.०५.२०२६ ते १५.०५.२०२६ अशी वाढविण्यात आली होती. तथापि, काही अर्जदारांनी केलेल्या मौखिक विनंत्या तसेच तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्यासाठीची मुदत पुनः एकदा वाढविण्यात येत असून सुधारित अंतिम मुदत पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे : सुधारित अंतिम मुदत : ३१.०५.२०२६ दि. ३१ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत लागू राहतील.


मान्यवर

श्री. देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
मा. मंत्री सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास
डॉ. किरण कुलकर्णी (भा.प्र.से.)
सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग
श्री. श्रीराम मालती कमलाकरराव पांडे
संचालक (अ. का.), सांस्कृतिक कार्य संचालनालय

छायाचित्र दालन

  • वेंगुर्ला महोत्सव
    सांस्कृतिक स्वागत समारंभ,
    सांस्कृतिक स्वागत समारंभ
    मोगरा फुलाला .