महाराष्ट्र शासन
 सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

सांस्कृतिक कार्य संचालनालय हे खालील दर्शविलेल्या उदिष्टांची पुर्तता करण्यासाठी कटीबद्ध आहे.

कलेचे जतन व संवर्धन करणे.

उदयोन्मुख कलाकारांना आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे व त्यांची कला अधिकाधिक वृद्धिंगत तसेच विकसित करण्यास मदत करणे.

ग्रामीण भागातील कलाकारांना कलेचे पायाभूत ज्ञान मिळावे या दृष्टीने विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे.

दुर्गम भागात कला पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने तेथील स्थानिक व्यक्तींना कलेचा आनंद प्राप्त करून देणे.

कला संस्थांना त्यांच्या प्राथमिक गरजा पुर्ण करण्यासाठी आणि विविध कलाक्षेत्रातील पात्र संस्थांना कला समृद्ध करण्यासाठी सहाय्यक अनुदान देणे व त्यातुन कला समृद्ध करणे.

कलेला वाव देण्याच्या उद्देशाने व कलाकारांचे प्रश्न तातडीने निपटारा करण्यासाठी राज्यातील महसुली विभागात सांस्कृतिक कार्य संचालनालयाची कार्यालये विभागीय स्तरावर स्थापित करणे.

वंचित झालेल्या व कलाक्षेत्रातील योगदान दिलेल्या कलाकारांना शासनाने गठीत केलेल्या समितीव्दारे शिफारसपात्र कलाकार व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करणे.

नाट्य, बालनाट्य, शाहिरी, तमाशा, किर्तन, सुगम संगीत व शास्त्रीय नृत्य या कलाक्षेत्रातील शिबिरे आयोजन करुन कलेस प्रोत्साहन देणे.

वयोवृद्ध गरजु पात्र कलाकारांना आर्थिक मदत म्हणून शासन नियमाप्रमाणे मानधन प्रदान करणे.

शासनाच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या प्रयोगात्मक नोंदणीकृत संस्थाना अनुदान देऊन सांस्कृतिक चळवळीचे सशक्तीकरण करणे.

आंतराराज्यीय सांस्कृतिक आदान-प्रदान योजनेद्वारे महाराष्ट्र राज्याचे सम्यक दर्शन इतर राज्यांना घडविणे.

ध्वनीचित्रफ़ितीव्दारे लोककला व इतर कलेचे जतन व संवर्धन करणे.