Accessibility Tools
A+
A−
High Contrast
Negative Contrast
Links Underline
Readable Font
Reset


 महाराष्ट्र शासन
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई

प्रस्तावना : सांस्कृतिक कार्य संचालनालय

        महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे.

        महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी तत्कालीन मा.मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे, या गोष्टीस मान्यता दिली. सन १९६०-७० या दशकातील पंचवार्षिक योजनांना मान्यता मिळताच सन १९७० साली मनोरंजन समितीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये रुपांतर करण्यात आले.

        सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात. या राज्यातील सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सव आयोजित करण्यात येतात. त्यात राज्य नाट्य, संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गमंत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी विविध कला महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे, शाहिरी प्रशिक्षण शिबिरे, विधीनाटय प्रशिक्षण शिबिरे, दशावतार प्रशिक्षण शिबिरे, दंडार प्रशिक्षण शिबिरे, खडीगंमत प्रशिक्षण शिबिरे, झाडीपट्टी प्रशिक्षण शिबिरे, संगीतबारी /लावणी प्रशिक्षण शिबिरे अशी प्रत्येकी दहा दिवसाचे या प्रमाणे एकूण ६० शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतंर्गत कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे, सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देणे इत्यादी कामे या संचालनालयाकडे आहेत. अधिक माहिती

ठळक घडामोडी

मान्यवर

श्री. देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित आशाताई अनंतराव पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य विभाग
डॉ. किरण कुलकर्णी
सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग
श्री. बिभीषण भामाबाई मारुती चवरे
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय

छायाचित्र दालन

  • श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा .
    श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा
    वारसा सह्याद्रीचा ...
    वारसा सह्याद्रीचा ,